Breaking News

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

District level vigilance committee meeting held under the chairmanship of Guardian Minister Balasaheb Patil

     सातारा  (जिमाका) :  जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

      या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

      शासनमान्य स्वस्त धान्य दुकांनाची वेळोवेळी तपासणी करावी. तसेच स्वस्त धान्य दुकानांमार्फत ज्या ज्या शासकीय योजनेंतर्गत लाभ दिला जातो त्याचे भित्तीपत्रके दुकानाबाहेर लावावीत, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी केल्या.

   शिवभोजन थाळीमुळे गरजु लोकांना जेवण मिळत आहे. ज्याची जिल्ह्यात व्याप्ती वाढवावी, अशा सूचना आमदार श्री. शिंदे यांनी बैठकीत केल्या.

   या बैठकीत दोन वर्षात दुकानांवर केलेल्या कारवयांची संख्या, आधार सेटिंग प्रमाण, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अन्नधान्य वितरण व राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना या विषयांवर चर्चा करण्यात आली.

No comments