Breaking News

फलटण शहरात कोरोना वाढला ! तालुक्यात 186 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 72, कोळकी 16, जाधववाडी 11

Corona grew in the Phaltan! 186 corona positive in the Phaltan taluka

    फलटण दि. 22 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 21 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 186 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 72  रुग्ण तर ग्रामीण भागात 114  रुग्ण सापडले आहेत. दरम्यान फलटण शहरात कोरोना वाढला असुन, रुग्नसंख्येत वाढ होत आहे.  तालुक्यात जाधववाडी येथे 11 व कोळकी येथे 16  बाधित रुग्ण सापडले आहेत.  तिसऱ्या लाटेत प्रथमच 186 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असुन ही बाब चिंताजणक आहे. नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.

     दि. 21 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 186 बाधित आहेत. 186 बाधित चाचण्यांमध्ये 59 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 127 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 72 तर ग्रामीण भागात 114 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 16, जाधववाडी 11, घाडगेमळा 1, खराडेवाडी 4, खामगाव 1, खटकेवस्ती 3, बरड 3, कोळकी 16, साखरवाडी 10,  कोरेगाव 2, मुरूम 3, बीबी 1,  तिरकवाडी 1, निंबळक 3, फडतरवाडी 5, दऱ्याची वाडी 1, दुधेबावी 2,  तरडगाव 1, नांदल 1,  टाकळवाडा 1, आळजापुर 2,  आदर्की बुद्रुक 6, ठाकूरकी 2,  कापशी 1, कुरवली खुर्द 1, पिंपरद 1, विडणी 4, जिंती 2, निंभोरे 1,  निरगुडी 1, गिरवी 2, फरांदवाडी 1,  रावडी बुद्रुक 1, राजुरी 1, सासवड 2, सोनवडी 1, सस्तेवाडी 5, सुरवडी 2,  दालवडी 1, वाठार निंबाळकर 1,  वडगाव 1, तांबवे 1, लोणंद तालुका खंडाळा 1, कुरणेवाडी तालुका बारामती 1, , पिसुर्डी तालुका भोर 1,  शिंगणापूर 1   रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments