Breaking News

रमाई घरकुल योजनेंतर्गत 835 घरकुलांना मंजूरी

835 houses sanctioned under Ramai Gharkul scheme

    सातारा   (जिमाका) :  रमाई घरकुल निर्माण जिल्हास्तरीय समिती (ग्रामीण) ची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये सन 2021-22  रमाई घरकुल आवास योजनेंतर्गच्या  835 घरकुलांना मंजुरी देण्यात आली.

    या बैठकीला आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये रमाई आवास योजनेंतर्गतच्या 835 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या घरकुलांसाठी 10 कोटी 2 लाख इतका निधी खर्च करण्यात येणार आहे.

    अनुसूचित जातीच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:च्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारे पक्के घर बांधणे शक्य होत नाही. पर्यायाने त्यांना झोपडीमध्ये वास्तव्य करावे लागते. ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून लाभार्थ्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्या घराच्या ठिकाणी पक्के घर देणे हा मुळ उद्देश या योजनेचा आहे.

No comments