Breaking News

गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाची दक्षता समिती ; अध्यक्षपदी खासदार रणजितसिंह

BJP's vigilance committee to preserve the sanctity of forts; MP Ranjit Singh as President

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.22 जानेवारी -  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दक्षता समितीची स्थपणा करण्यात आली आहे.  या समितीच्या अध्यक्षपदी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

    राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या साथीने शिवसेनेचे सरकार नोव्हेंबर 2019 मध्ये सत्तेवर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते व त्यांच्यामुळे आज हिंदू समाज अस्तित्वात आहे. तरीही सध्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाच्या सोईने शिवाजी महाराजांचे चरित्र सांगण्याचा घातक प्रयत्न सुरू झाला आहे. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षात चालू झाले आहेत.

    गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती स्थापन करण्यात येत आहे. ही समिती भेट देऊन, गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करेल आणि नंतर संपूर्ण पक्ष जनजागृती करून गडांचे पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करेल.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाची प्रदेश दक्षता समितीच्या अध्यक्षपदी खासदार रणजितसिंह हिंदुराव निंबाळकर तर सदस्य पदी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे श्री. विक्रम पावसकर, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष, सौ. वर्षा डहाळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस, पुणे, श्री. नितीनराजे शिंदे, माजी आमदार, सांगली हे असणार आहेत तर समितीचे मार्गदर्शक भाजपा राष्ट्रीय सचिव मा. सुनिल देवधर असतील असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केली आहे.

No comments