Breaking News

गृह विलगीकरणातील नागरिकांनी प्रकृतीची माहिती यंत्रणेला कळवावी - जिल्हाधिकारी

Citizens should report the nature of the house separation to the system - Collector

     सातारा (जिमाका) : रॅपिड ॲन्टेजन चाचणी अथवा होम किटद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या आणि गृह विलगीकरणातील नागरिकांनी आपल्या प्रकृतीची माहिती आरोग्य यंत्रणेला देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

     कोविड विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वाढत असल्याने बरेचसे नागरिक रॅपिट ॲन्टीजन चाचणी करुन घेतात. पॉझिटिव्ह आल्यास गृह विलगीकरणात उपचार घेतात. मात्र त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येवू शकतो. त्यामुळे या नागरिकांच्या दैनंदिन प्रकृतीवर लक्ष ठेवणे सोपे व्हावे, त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा स्थानिक आरोग्य यंत्रणेला आपली माहिती कळवावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

    होम किटची विक्री करणाऱ्या औषध दुकानदारांनी ग्राहकांची माहिती संकलित करुन ठेवावी. जेणे करुन कुठल्या क्षेत्रात जास्त विक्री होते ती माहिती होईल, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

No comments