Breaking News

धोका वाढला! फलटण तालुक्यात 115 कोरोना पॉझिटिव्ह ; शहर 36, कोळकी 10

115 corona positive in Phaltan taluka; City 36, Kolaki 10

     फलटण दि. 15 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 14 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 115 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 36 रुग्ण तर ग्रामीण भागात 79  रुग्ण सापडले आहेत.  दरम्यान फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, तिसऱ्या लाटेत प्रथमच 115 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढलेला आहे. नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

     दि. 14 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 115 बाधित आहेत. 115 बाधित चाचण्यांमध्ये 57 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 58 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 36 तर ग्रामीण भागात 79 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 10, जाधववाडी 6,  साखरवाडी 5,  खटकेवस्ती 3, कापशी 2, कुरवली बुद्रुक 1, झिरपवाडी 1, मिरेवाडी 1, हिंगणगाव 2,  विडणी 3, जिंती 1, होळ 2,  पाडेगाव 1, राजाळे 2, सासवड 2, सावंतवाडा 3, दुधेबावी 3,  वाठार निंबाळकर 3, तरडगाव 3, तावडी 1, आदर्की 1, बोडकेवाडी 3, मुंजवडी 1, शिंदेवाडी 1, गिरवी 3, फरांदवाडी 1, फडतरवाडी 2, सांगवी 1,  सस्तेवाडी 2, तांबवे 1, जावली 1, अलगुडे वाडी 2, डिस्कळ तालुका खटाव 1, पणदरे 1, पुणे  1, नातेपुते 1, नेवासा 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments