Breaking News

सासकल येथे डाळींब फळपीक शेतीशाळेला शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

Farmers good respond to pomegranate orchard at Saskal

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सासकल ता फलटण- महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत सासकल येथे फळपिकावरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत डाळींब फळपीकावरती शेतकऱ्यांची शेतीशाळा आयोजित केली होती.

    यावेळी मंडळ कृषि अधिकारी विडणी अमोल सपकाळ यांनी शेतकऱ्यांची शेती शाळा प्रात्यक्षिकांवर आधारित असून आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळण्याचे उत्तम माध्यम असल्याचे तसेच शेतीशाळा मध्ये  शेतकऱ्याना मिळालेले तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणेबाबत आवाहन केले.

    यावेळी विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र बोरगाव  ता.सातारा डॉ स्वाती गुरवे यांनी डाळींब पिकावरील कीड व रोग नियंत्रण बाबत सविस्तरपणे माहिती दिली. तसेच सध्या मका पिकाचे क्षेत्र वाढत असून मका पिकावर प्रादुर्भाव वाढत असलेल्या मका पिकांवरील लष्करी अळी नियंत्रण व रबी हंगामातील हरभरा घाटे अळी बाबत माहिती दिली, तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे  डॉ. स्वाती गुरवे यांनी दिली. 

    यावेळी रुपेश मुळीक यांच्या डाळींब पिकाच्या फळबागेत परिसंस्था अभ्यास घेण्यात आला यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा तसेच सेंद्रिय खते औषधे याबाबत माहिती व मार्गदर्शन शेती आविष्कार ऑरगॅनिक ऍग्रो प्रोड्युसर कंपनी (F.P.O ) चे संचालक अशोक भोसले यांनी केले.

    यावेळी कृषी पर्यवेक्षक अंकूश इंगळे ,कृषी सहाय्यक सासकल सचिन जाधव  व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

No comments