Breaking News

सातारा जिल्ह्यात 53 कोरोनाबाधित ; सातारा 19, फलटण 7

53 corona affected in Satara district; Satara 19, Phaltan 7

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 1 जानेवारी -  जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

 जावली 2 (10065), कराड 6 (39348), खंडाळा 5 (14238), खटाव 2 (25988), कोरेगांव 3 (22013), माण 4 (18093), महाबळेश्वर 2  (4775), पाटण 0 (10165), फलटण 7 (37579), सातारा 19 (52352), वाई 1 (15823) व इतर 2 (2221) असे आज अखेर एकूण 252660 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

     जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 15 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

No comments