मुधोजी महाविद्यालयाच्या 12 विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मुधोजी महाविद्यालयातील एकूण बारा विद्यार्थ्यांना सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यामध्ये कला शाखेतील - मोहिते काजल रमेश, कुंभार सुमित दत्तात्रेय, बावळे प्राची प्रशांत, वाणिज्य शाखेतील - भांडवलकर उर्मिला विश्वास, कोलवडकर पूजा बाळासो, शहा प्राजक्ता अमोल, कचरे नीलम प्रकाश, जाधव प्राजक्ता राजेंद्र, शिंदे मयूर रामचंद्र व विज्ञान शाखेतील - शेडगे विवेक पोपट, काटकर प्राची संजय, पोरे वैष्णवी राजेंद्र या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त करून महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे.
महाविद्यालयाच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (सभापती, विधान परिषद महाराष्ट्र राज्य), संस्थेचे सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सन्माननीय सदस्य, प्रशासन अधिकारी मा.प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
No comments