फलटण तालुक्यात 106 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 44
फलटण दि. 16 जानेवारी 2022 (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 15 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 106 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 44 रुग्ण तर ग्रामीण भागात 62 रुग्ण सापडले आहेत. दरम्यान फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच असून, आजही रुग्ण संख्या शंभरच्या वर गेली आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढलेला आहे. नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
दि. 15 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 106 बाधित आहेत. 106 बाधित चाचण्यांमध्ये 32 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 74 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 44 तर ग्रामीण भागात 62 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात जाधववाडी 6, धुळदेव 5, ठाकुरकी 4, कोळकी 3, सासवड 4, आदर्की बुद्रुक 4 तरडगाव 3, मिरेवाडी 1, हिंगण गाव 1, विडणी 3, पाडेगाव 2, राजाळे 2, सरडे 1, तामखडा 1, ताथवडा 1, आंदरुड 1, टाकळवाडा 1, ढवळ 1, कोरेगाव 1, मलवडी 1, निरगुडी 3, गिरवी 1, होळ 3, फडतरवाडी 2, रावडी खुर्द 1, सांगवी 1, सस्तेवाडी 2, दालवडी 1, चव्हाणवाडी 1, तांबवे 1, रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments