घरफोडीच्या हत्यारासह दोघांना अटक ; ९५ हजरांचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३१ डिसेंबर - फलटण येथील सीटी बाझारच्या शेजारी आडोशाला चोरी किंवा घरफोडी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने, दोन इसम हत्यारासह अंधारात लपुन बसलेले होते, पेट्रोलिंग करणाऱ्या शहर पोलिसांनी त्यांना पकडले असता, त्यांच्याकडे डेरीमिल्क कॅडबरीचे 7 बॉक्स, चोको बेक्स कुकीजचे बॉक्स व एक लोखंडी कटावणी असा माल सापडला. शहर पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन एकूण ९५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी फलटण येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.२९ डिसेंबर २०२१ रात्री व दि. ३० डिसेंबर २०२१ पहाटे या कालावधीत फलटण शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पोलिसांना २:४५ वाजण्याच्या सुमारास प्रतापलाल गौतमचंद दोशी यांच्या दुकानाच्या पाठीमागील बोळीत अंधारात, सीटी बाझारचे शेजारी आडोशाला १) छोटा मछली ऊर्फ निलेश हिरालाल चव्हाण २६ वर्षे, रा. उमाजी नाईक चौक, पवारगल्ली फलटण २) नाने रामसेवक कश्यप वय 22 वर्षे मुळ मुळ रा.थाना धारियागंज उत्तरप्रदेश सध्या रा. नारळीबाग फलटण हे मोटार सायकल उभी करुन, अंधारात लपुन बसले होते, चोरीसारखा/घरफोडीसारखा मालमत्तेचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने अंधारात आपले अस्तित्व लपवुन बसले होते. पोलीसांची चाहुल लागताच, दोघेजण मोटार सायकलसह पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना, शहर पोलिसांनी त्यांना पकडुन, त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे, डेरीमिल्क कॅडबरीचे ७ बॉक्स, चोको बेक्स कुकीजचे बॉक्स माल व घरफोडीचे हत्यार लोखंडी कटावणी आढळून आली.
पोलिसांनी त्यांच्याकडून एक मोटर सायकल, डेरीमिल्क कॅडबरीचे ७ बॉक्स, चोको बेक्स कुकीजचे बॉक्स असा ९५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
No comments