महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालक पदी दिलीपसिंह भोसले यांची निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालक पदी श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या महाराजा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ची श्री. दिलीपसिंह भोसले यांनी 2010 साली स्थापना करून आज मितीस या संस्थेच्या आठ शाखा सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यात कार्यरत आहेत. या संस्थेची वार्षिक उलाढाल 404 कोटी 28 लाख 54 हजार रुपये आहे. नफा 1 कोटी 27 लाख आहे गेली दहा वर्ष 2010 ते 2019 मध्ये शून्य टक्के एनपीए, शून्य टक्के येणे व्याज, शून्य टक्के थकबाकी राखण्यात या संस्थेला यश प्राप्त झाले आहे तसेच या संस्थेस सलग तीन वेळा नॅशनल अवार्ड मिळालेला आहे. संस्थेचे कामकाज पाहता फेडरेशनने संचालक पदासाठी श्री दिलीपसिंह भोसले यांची शिफारस करून या पदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पुणे येथे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबळे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
श्री .भोसले यांच्या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फेडरेशनचे विद्यमान चेअरमन सुरेशराव वाबळे , व्हाईस प्रा. अक्कलकोटे पाटील सहकार, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments