Breaking News

ताथवडा येथे भरदिवसा घरातून १ लाख २० हजार रुपयांची चोरी

Theft of Rs. 1 lakh 20 thousand from a house at Tathawada

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - ताथवडा ता. फलटण येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात घुसून घरात ठेवलेली १ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

    दशरथ बाबासो शिंदे हे भिवंडी येथे कामास आहेत, ते कामानिमित्ताने दि. २४ नोव्हेंबर रोजी आपल्या ताथवडा ता. फलटण या गावी आले होते. शेतीच्या कामासाठी मुंबई वरुन येताना ८० हजार रुपये आणले होते व उसाचे बील ४० हजार रुपये आले होते, असे एकुण १ लाख २० हजार रुपये दशरथ शिंदे यांनी पत्नी मंदाकिनी हीचेकडे ठेवण्यास दिले. त्यांनी ते पैसे ताथवडा येथे घरात ठेवले. त्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दशरथ शिंदे हे  माळेगाव साखर कारखाना ता. बारामती जि. पुणे या ठिकाणी उसतोडीचे संदर्भात गेले. ताथावडा येथे दुपारी  ३:०० ते ३:३० वाजण्याच्या सुमारास दशरथ शिंदे यांची पत्नी मंदाकिनी ही शेळीस वैरण आणण्यासाठी शेतात गेली असता, उघड्या घरात घुसुन, कोणीतरी अज्ञात चोरट्याने, घरात ठेवलेले १ लाख २० हजार रुपये चोरून नेले असल्याची फिर्याद दशरथ बाबासो शिंदे यांनी दिली आहे.

No comments