Breaking News

डॉ. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये मानवकल्याणाची ताकद असून या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया - महेंद्र सूर्यवंशी बेडके

Mahendra Suryavanshi Bedke greeted Babasaheb Ambedkar on the occasion of Mahaparinirvana Day

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) ६ डिसेंबर -   महापरिनिर्वाणदिनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

    डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला, समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये मानवकल्याणाची ताकद असून या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया. ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिली याच महान विचाराचे पालन आपण सर्वांनी करावे असे आवाहन फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी केले.

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी महेंद्र सूर्यवंशी बेडके बोलत होते. या वेळी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, अनुसूचित विभाग जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर, अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष ताजुद्दीन बागवान, शहर काँग्रेसचे खजिनदार बालमुकुंदास भट्टड,सोपानराव जाधव, युवक तालुका आहे अजिंक्य कदम उपस्थित होते.

No comments