Breaking News

सातारा जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथीयाची राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी

Registration of the first transgender person in Satara district on the national portal

    सातारा दि.13 (जिमाका):  सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यास सातारा जिल्ह्यातून प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झालेली असून पहिल्या तृतीयपंथीयाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याची माहिती  समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.

    सातारा जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी https://transgender.dosje.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून Apply Online यावर आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करुन आपली सर्व माहिती भरावी. ऑनलाईन अर्जासोबत आयकार्ड साईज फोटो, स्कॅन केलेली सही, आपण तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करावीत. सर्व तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी https://transgender.dosje.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहनही श्री. उबाळे यांनी केले आहे.

No comments