प्रभाग क्रमांक १० मध्ये ९ रस्त्यांच्या कामांचे श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते भूमिपूजन
फलटण ( प्रतिनिधी ) - फलटण शहरातील विविध नवीन रस्त्यांची कामे सुरु झाल्याने भुयारी गटारीच्या कामामुळे झालेली नागरिकांची गैरसोय लवकरच दूर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांंनी केले. +
प्रभाग क्रमांक १० मधील विविध ९ रस्त्यांच्या कामांचा भूमिपूजन समारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रंगारी महादेव मंदिराजवळ बारस्कर गल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. समारंभास आ.दिपकराव चव्हाण, फलटणच्या नगराध्यक्षा मा सौ. निता मिलिंद नेवसे, बांधकाम सभापती श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभाग क्र. १० मधील बारस्कर गल्ली परिसरातील, अंडीवाले बोळ, कैकाडवाडा, बोर्डिंग, डॉ.जगताप बोळ आदी ठिकाणच्या ९ रस्त्यांचे काम सुरु होत आहे. समारंभास नगरसेविका प्रगतीताई कापसे, वैशालीताई अहिवळे , ज्योत्स्ना शिरतोडे , रंजना कुंभार दादासाहेब चोरमले, सुधीर अहिवळे , अनिल शिरतोङे ,अमरसिंह खानविलकर, श्यामसुंदर शास्त्री, अरविंदभाई मेहता, विजय मायणे ' , किरकिरे सर , सिकंदर ङांगे श्रीकांत बाजारे, सुयश बाजारे , हर्षल निंबाळकर, संदिप बिङवे, प्रकाश तेली , किरण काटकर , सुनिल गणदास , प्रतिक लाळगे उपस्थीत होते.
No comments