प्रवाशी बनून आलेल्या भामट्यांनी केली जबरी चोरी ; इर्टीगा गाडी नेली पळवून
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि.२२ ऑक्टोबर - नेरूळ मुंबई येथून खाजगी इर्टीगा गाडीत बसलेल्या प्रवाशांनी पुण्यात आल्यानंतर वडील मयत झाल्याचा बहाणा करून, इर्टीगा गाडीला शिरवळ च्या पुढे आणली व गाडी बाजूला घेऊन चकूचा धाक दाखवला व इर्टीगा गाडी पळवून नेऊन जबरी चोरी केली. सदरचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.
फिर्यादी नानाभाऊ बाबुराव खारतोडे वय 34 वर्षे, धंदा व्यवसाय, रा. नर्मदा बिंल्डीग गणेश मंदीराजवळ ,फुरसुंगे गाव, ता.हवेली जि.पुणे मुळ पत्ता रा.उंडेगाव पोस्ट वाटेखळ, ता.पंरडा, जि. उस्मानाबाद, यांनी नेरूळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या माहितीनुसार, दि.11/10/2021 रोजी रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास बोरीवली मधुन पुणे येथे जाण्यासाठी निघालो होतो, व साधरणतः रात्री 11.45 वा दरम्यान मी एल पी चौक नेरूळ येथे प्रवासी घेण्यासाठी थांबलो असता, तिन प्रवासी इसम अंदाजे वय 25 ते 30 वर्षे हे माझे कार जवळ येवुन, त्यांना पुणे येथे जायचे आहे. असे सांगुन बसले व त्यांना घेवुन मी पुण्याला निघालो. व पुढे दि.12/10/2021 मध्यरात्री 02.30 वा सुमारास मी सयाजी सी.एन.जी पंप कोथरूड पुणे येथे त्यांना सोडले व मी सी.एन.जी भरायला थांबलो, तेव्हा उतरलेले तिन्ही प्रवासी माझ्या जवळ येवुन, त्या तिघापैकी एकाने माझे वडील मयत झाले असुन, आम्हाला शिरवळ येथे जायचे आहे, असे सांगितल्याने मी सी.एन.जी भरून कार घेवुन, शिरवळकडे निघालो, व साधरणतः 03.15 शिरवळ येथे पोहचल्यानंतर, त्यांनी मला, शिरवळच्या पुढे गाव आहे, असे सांगुन मला गाडी पुढे घ्यायला सांगितली व मी गाडी शिरवळच्या पुढे डाव्या बाजुने चार ते पाच कि.मी. गेल्यानंतर त्यांनी मला गाडी बाजुला घेण्यास सांगितले, तेव्हा माझ्या कारचा वेग कमी करून, कार बाजुला घेत असताना, अचानक माझ्या पाठीमागच्या सिटवर बसलेल्या इसमाने अचानाक माझा गळा दाबला, व माझ्या बाजुला बसलेल्या इसमाने चाकु काढुन धमकी दिली की , तुझी सुपारी एक लाखाला दिली आहे व तुला मारणार, नाहीतर पैसे घेवुन तुझ्या नातेवाईकाना बोलव, नाहीतर तुझी गाडी सोडुन निघुन जा, असे बोलुन मला तिघांनी मारहाण करून खाली उतरवुन, माझ्या ताब्यातील इर्टीगा कार क्र एम.एच 12 आर वाय 3087 कार घेवुन निघुन गेले असल्याची फिर्याद नानाभाऊ बाबुराव खारतोडे यांनी दिली आहे.
सदरची फिर्याद नेरूळ मुंबई पोलीस ठाण्यातून वर्ग होवुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यास प्राप्त झाली आहे.
No comments