Breaking News

जिल्ह्यात मनरेगा योजनेमार्फत यशवंतराव चव्हाण समृध्द गाव अभियान

Yashwantrao Chavan Samriddh Gaon Abhiyan in the district through MGNREGA scheme

1सातारा  (जिमाका):  महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यशवंतराव चव्हाण समृध्द गाव अभियान दि. 2 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणेत येत आहे.

1महात्मा गांधी राष्ट्रीय गामीण रोजगार हमी  योजनेअंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत यंत्रणाने सातारा जिल्ह्यामध्ये “मी समृध्द तर गाव समृध्द, गाव समृध्द तर मी समृध्द पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द” या तत्वाने वाटचाल सुरु केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करुन शाळांचा कायापाटल करणे, गांवामध्ये स्थायी मत्ता निर्माण करुन गावांचा भौतिक विकास करणे, गावातील कुंटुबाना रोजगार उपलब्ध करुन देवून त्यांचा सर्वांगिण विकास करुन लखपती करण्याच्या उद्देशाने सातारा जिल्हा परिषद मार्फत हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

 गावपातळीवर मजुरी व साहित्य (अकुशल व कुशल ) 60:40 चे गुणोत्तराचे प्रमाण राखण्यासाठी खालील प्रमाणे नमुना पॅकेज सातारा जिल्हा परिषदेने तयार केलेली आहेत.

  • घरकुल लाभार्थी कुटुंबाला पॅकेज स्वरुपात लाभ: पॅकेज घरकुल, गांडुळ खत / नाडेफ खत, शौचालय, शोषखड्डा,
  • मजूर कुटुंबासाठी पॅकेज स्वरुपात लाभ. पॅकेज क्र.1 पाणंद रस्ता,जनावरांचा गोठा, शोषखड्डा पॅकेज क्र.2 पाणंद रस्ता, शेळीपालन शेड / कुक्कुट पालन शेड, शोष खड्डा पॅकेज क्र.3 वृक्षलागवड, जनावरांचा गोठा, शोष खड्डा
  • शेतकरी कुटुंबासाठी पॅकेज स्वरुपात लाभ: पॅकेज क्र.1 जनावरांचा गोठा, गांडुळखत,फळबाग लागवड, शोष खड्डा पॅकेज क्र.2 शेळीपालन शेड / कुक्कुट पालन शेड, गांडुळखत / नाडेफ खत, फळबाग लागवड, शोष खड्डा पॅकेज क्र.3 सिंचन विहिरी, जनावरांचा गोठा, शेत बांध बधिस्त, फळबाग लागवड, शोष खड्डा, गांडुळखत, / नाडेफ खत, पॅकेज क्र.4 शेततळे, फळबाग लागवड, जनावरांचा गोठा, शोष खड्डा, गांडुळखत, / नाडेफ खत,
  • शाळेचा कायापालट करण्यासाठी घ्यावयाची कामे: पॅकेज क्र.1 शाळा संरक्षण भिंत,वृक्षलागवड,सलग समतल चर. पॅकेज क्र.2 शाळा शौचालय,पाणंद रस्ता. पॅकेज क्र.3 शाळा संरक्षण भिंत, शाळा शौचालय,दगडी बांध, पाणंद रस्ता, वृक्षलागवड, पॅकेज क्र.4 शाळा संरक्षण भिंत, शाळेसाठी खेळाचे मैदान, शाळा शौचालय, वृक्षलागवड,सलग समतल चर.
  • गाव विकासाची कामे : पॅकेज क्र.1 स्मशान भुमी शेड, दगडी बांध,  वृक्षलागवड. पॅकेज क्र.2 शेतमाल साठवण्यासाठी गोदाम, दगडी बांध, सलग समतल चर. पॅकेज क्र.3 क्रॉक्रीट नालाबाधणे, सलग समतल चर, वृक्षलागवड.

     वरील सर्व पॅकेज हे नमुना स्वरुपात असुन मनरेगा मधील 262 प्रकारची कामांपैकी मजुरी व साहित्याचे (अकुशल व कुशल ) 60:40 चे गुणोत्तराचे प्रमाण राखून इतर कामे घेवून विविध प्रकराची पॅकेज तयार करुन पॅकेज स्वरुपात लाभ देता येईल .

  या अभियाना संदर्भात परिणामकारक समन्वय साधणे, सनियंत्रणकरणे, कामे दर्जेदार जिल्हा व तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच यशवंतराव चव्हाण समृध्द गाव अभियानामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका स्तरावर 3 व जिल्हा स्तरावर 3 ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौराविण्यात येणार आहे. 

 अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये यशवंतराव चव्हाण समृध्द गाव अभियान  राबविण्यात येवून मध्ये “मी समृध्द तर गाव समृध्द, गाव समृध्द तर मी समृध्द पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द” या तत्वाने ग्रामीण कुटुंबांचे जीवमान उंचावणे, शाळांचा कायापालट करणे गावांमध्ये स्थायी मत्ता निर्माण करुन गावांचा भौतिक विकास करण्याचा उद्देशाने कामे घ्यावी, असे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.   

No comments