Breaking News

वाचन प्रेरणा दिना निमित्ताने राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Organizing various programs on the occasion of Reading Inspiration Day by the State Board of Literature and Culture

  मुंबई - माजी राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस  15 ऑक्टोबर रोजी या वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध विषयांवरील चर्चासत्र, व्याख्यान, परिसंवाद त्याचबरोबर लेखकांची भेट, वाचक मेळावा आणि अभिवाचन स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
     महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या या विविध उपक्रमांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या सर्व व्यासपीठांवर तसेच डिजीटल व्यासपीठावर वेळोवेळी प्रसिद्धी दिली जाणार आहे.       
वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम :-

  • दि. 16 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा. वाचक मेळावा, अभिवाचन व व्याख्यान विषय : वाचन : गरज व फायदे, चला पुस्तकांशी दोस्ती करुया,  सहभाग : डॉ.बाळू दुगडूमवार, श्री. विनोद झुंजारे व विद्यार्थी
  • दि. 16. ऑक्टोबर 21, सकाळी 11.00 ऑनलाईन, व्याख्यान विषय : वाचनाचे महत्त्व, डॉ.वीरा राठोड,
  • दि. 16. ऑक्टोबर 21, सकाळी 10.00, व्याख्यान विषय : मला आवडलेले पुस्तक, महाविद्यालयातील युवक,
  •  सायं 5.00 : लेखक भेट संवाद विषय : काय वाचायच आणि कशाला वाचायचं, प्रा.डॉ. किशोर सानप,
  • . 16. ऑक्टोबर 21, दुपारी 2.30, साहित्य अभिवाचन, पदव्युत्तर मराठी विभागातील विद्यार्थी व अध्यापक,
  • दि. 16. ऑक्टोबर 21,   सायं. 5.00 वा. अभिवाचन; डॉ. प्रभाकर देसाई श्री. किरण वैद्य;
  • दि. 16. ऑक्टोबर 21, दुपारी 4 ते 6, संवाद, विषय: संवाद साधुया दिग्गजांशी, डॉ. स्नेहलता देशमुख प्रा. रोहिणी चिंदरकर,
  •  दि. 16. ऑक्टोबर 21,   सायं. 6.00 वा.  कविता लेखन कार्यशाळा डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी डॉ. सदानंद देशमुख श्री. किशोर बळी,
  • दि. 16. ऑक्टोबर 21,  सायं. 6.00 वा. व्याख्यान विषय : वाचू आनंदे, श्री. अशोक अलगोडी,
  •  दि. 16. ऑक्टोबर 21,  सायं. 5.00 वा. व्याख्यान विषय: कोरोना काळातील वाचनवृद्धी, डॉ.माधवी रायते,
  • दि. 17. ऑक्टोबर 21, सायं. 5.00 वा. व्याख्यान विषय : संस्थांची शतकोत्तर आव्हाने
  • दि. 17. ऑक्टोबर 21, साय. 5.00 वा. विषय : वाचन संस्कृती व्याख्यान, श्री.गजानन श्रीधर नामदेव,
  •  दि. 18. ऑक्टोबर 21, सकाळी 10.00 वा. व्याख्यान वाचन संस्कृती, डॉ.व्ही.एन. शिंदे
  • दि. 18. ऑक्टोबर 21, दुपारी 4.00 ते 5.30 वा. विषय : पुस्तक, माणूस, निसर्ग वाचलाच पाहिजे  प्रा. मनोज बोरगावकर,
  •  दि.18. ऑक्टोबर 21, सायं. 5.00 वा. व्याख्यान विषय : साहित्यातील अनुवादाच्या संधी डॉ. गोपाळ महामुनी ( बेडकीहाळ) 

No comments