फलटण येथे नवरात्रोत्सवानिमित्त स्पर्धांचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० : नवरात्रोत्सवानिमित्त लायन्स क्लब फलटण, प्लॅटिनम, लायन्स माळजाई उद्यान समिती व गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटण यांच्या संयुक्त सहभागाने माळजाई मंदिर परिसर, फलटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन उद्यापासून करण्यात येत आहे. फलटणकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सोमवार, दि. ११ रोजी दुपारी ४ वाजता मिस फलटण स्पर्धा, मंगळवार, दि. १२ रोजी दुपारी ४ वाजता जागरण गोंधळ स्पर्धा व सायंकाळी ५ वाजता महाभोंडला, बुधवार, दि. १३ रोजी दुपारी ४ वाजता ओपन दांडिया स्पर्धा व सायंकाळी ५ वाजता परफेक्ट मॅचिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून वेदांत टेक्स्टाईल्स, श्रीराम बझार शेजारी, माळजाई उद्यान समोर, म. फुले चौक येथे अधिक माहिती व प्रवेश फी भरून नाव नोंदणीसाठी संपर्क करण्याचे आवाहन लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा सौ. नीलम लोंढे - पाटील यांनी केले आहे.
No comments