बेकायदा गुटखा ; १३ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० ऑक्टोबर - फलटण शहर पोलीसांनी क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण व दहिवडी चौक येथे बेकायदेशीर गुटखा व तत्सम पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनांवर धडक कारवाई करून १३ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०९/१०/२०२१ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना गोपनिय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, फलटण शहरामध्ये नानापाटील चौक व दहिवडी चौक फलटण या ठिकाणी १. महिंद्रा एक्स.यु.व्ही ५०० गाडी क्रमांक एम.एच.१० बी.एफ. ७८७८, २. मारुती सुझुकी वॅगनार गाडी क्रमांक एम.एच ०४ सौ.जं. ५४८३ या गाडयामधुन महाराष्ट्रामध्ये प्रतीबंधीत असणारे प्रतिबंधीत अन्न पदार्थ (विमल नावचा गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखु इतर गुटखा) यास गाडयामधुन वाहतुक होणार याबाबत खात्रीशिर माहीती मिळाली आहे. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किंद्रे यांनी, स.पो.नि गायकवाड, पो.ना. तांबे. ब.नं.३९३.म.पो.हवा. पानसरे ब.नं. २१४६ पथक क्रमांक २ पो.हवा धापते ब.नं.११८३, पो.हवा. फरांदे ब.न. १२९३, पोकों मेंगवाडे ब.नं. ५९२, पो.कॉ. जगताप ब.नं. २५२९ यांची वेगवेळी खास पथके तयार केली.
नाना पाटील चौक फलटण येथे पथक क्रमांक १ व दहिवडी चौक फलटण येथे पथक क्रमांक २ यांनी सापळा लावला असता, बातमी प्रमाणे १. महिंद्रा एक्स. यु.व्ही ५०० गाडी क्रमांक एम. एच. १० बी.एफ. ७८७८ ही संशयीत गाडी नानापाटील चौक फलटण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक फलटण दिशेकडुन आली, पोलिसांनी लागलीच गाडी थांबुवन गाडीतील इसम यांना नाव गाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांनी त्यांचे नाव समिर खानसाहेब आत्तार वय ३२ वर्ष २. संग्रामसिंह ज्ञानदेव बरकडे वय २५ वर्ष दोन्ही रा. जावळी ता.फलटण जि. सातारा असे सांगीतले. गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतीबंधीत असणारे प्रतिबंधीत अन्न पदार्थ (विमल नावचा गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखु व इतर गुटखा) हे मिळुन आले आहे.
तसेच पथक क्रमांक २ यानी दहिवडी चौक फलटण या ठिकाणी मारुती सुझुकी वैगनर गाडी क्रमांक एम.एच ०४ सी.जे. ५४८३ ही संशयीत गाडी कोळकी कडुन दहिवडी चौक फलटण या दिशेकडे आली असता सदर गाड़ी पोलीस ठाणे कडील पथकाने गाडी थांबुवन गाडीतील इसम यांस नाव गाव पत्ता विचारले असता त्यांने त्यांचे नाव महेंद्र आगमोगम कुंडवर ऊर्फ आण्णा वय ३६ वर्ष रा. लक्ष्मीनगर फलटण ता.फलटण जि. सातारा असे सांगीतले सदर गाडीची झडती घेतली असता, गाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतीबंधीत असणारे प्रतिबंधीत अन्न पदार्थ (विमल नावचा गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखु इतर गुटखा) हे मिळुन आले आहे. सदर कारवाई नंतर दोन्ही गाडी व महाराष्ट्रामध्ये प्रतीबंधीत असणारे प्रतिबंधीत अन्न पदार्थ (विमल नावाचा गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखु इतर गुटखा) हे पोलीस ठाणे आवारामध्ये लावण्यात आली आहेत.
नानापाटील चौक फलटण व दहिवडी चौक फलटण ता.फलटण जि. सातारा येथे इसम नामे १. समिर खानसाहेब अत्तार वय ३२ वर्ष २. संग्रामसिह ज्ञानदेव बरकडे वय २५ वर्ष दोन्ही रा. जावळी ता. फलटण जि. सातारा ३. महेंद्र आगमोगम कुंडबर ऊर्फ आण्णा वय ३६ वर्ष रा. लक्ष्मीनगर फलटण ता. फलटण जि. सातारा यांचे ताब्यात २ चारचाकी वाहने व महाराष्ट्रामध्ये प्रतीबंधीत असणारे प्रतिबंधीत अन्न पदार्थ (विमल नावचा गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखु) असा मिळुन एकुण १३,३९,४००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. या बाबत श्री विकास रोहिदास सोणवने, अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य जि. सातारा यांनी फिर्याद दाखल केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलोस उपनिरीक्षक सुरज शिंदे हे करीत आहेत.
सदर कारवाई मा. अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक, मा. अजित बोराडे अप्पर पोलीस अधिक्षक, मा.तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, मा.बी.के. किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि नवनाथ गायकवाड, पो.ना. शरद तांबे. ब.नं.३९३ ब.नं. २९४६, पोहवा. चंद्रकांत धापते ब.नं. ११८३, पो.हवा. रमेश फरांदे ब.. १२९३, म.पो.हवा. अनिता पानसरे पोना २११ अशोक वाडकर, पोको सुजित मेंगवार्ड ब.नं. ५९२, पो.कॉ. अचुत जगताप च.नं. २५२९ यांनी केली आहे.
No comments