नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय ई- कॉन्फरन्स संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय ,फलटण, ता.फलटण, जि.सातारा येथे शनिवार दि.25 /09 /2021 रोजी THE CHANGING IDEOLOGY AND MINDSET OF MODERN TIMES या विषयावर आंतरराष्ट्रीय ई- कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले होते.
या ई कॉन्फरन्स कार्यक्रमात श्रीराम एज्युकेशन सोसायटी ,फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून सॅलिस्बरी युनिव्हर्सिटी, अमेरिकेचे प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी सर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डी. पी. बी. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर चे प्राचार्य डॉ.एस. बी. क्षीरसागर सर आणि विश्वासराव रणसिंग कॉलेज, कळंब चे इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर गुलिंग सर उपस्थित होते. तसेच रिसोर्स पर्सन म्हणून अभिमत विद्यापीठ ,श्रीनगर ,जम्मू अँड काश्मीर येथील श्री. प्रताप कॉलेजचे बायोकेमिस्ट्री विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.दानिश काझी उपस्थित होते.
त्यांच्यासमवेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील तत्वज्ञान विभागातील निमंत्रित प्राध्यापिका प्रा. डॉ.कॅरिलेमला उपस्थित होत्या. तसेच कराईकल, पोंदूचेरी येथील शासकीय महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.गोपाळ धावडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरिफ तांबोळी यांनी केले, प्रस्तावना प्रा. डॉ. तेजश्री राऊत पवार यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्र. प्राचार्य डॉ. दीपक राऊत पवार यांनी केले. तर आभार प्रा.आरती शिंदे यांनी मानले.
No comments