श्रीराम ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेकडून कर्जदारांना व्याज रिबेट, सभासदांना लाभांश, कर्मचाऱ्यांना बोनस, कर्ज सवलत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोखळी या संस्थेची 21 वी वार्षिक सभा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. यामध्ये संस्थेच्या सभासदांना जे नियमित कर्ज भरतात त्यांना 13 टक्के व्याज रिबेट तसेच सर्व सभासदांना आठ टक्के लाभांश सर्व कर्मचाऱ्यांना 41 टक्के बोनस, कलेक्शन एजंटना 10 टक्के बोनस, ज्या सभासदांचे अहवाल साला मध्ये दुर्दैवी निधन झाले, त्यांना अनुकंपा ठेवीतून कर्ज रक्कम भरण्यासाठी 47 हजार रुपयांचे अनुकंपा निधीतून सवलत अशा एकूण 15 लक्ष 39 हजार रुपयाचे वाटप व त्यासोबत प्रामाणिक कर्ज भरणारे सभासद व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यासाठी एक लक्ष रुपयांची तरतूद देण्याचे ठराव वार्षिक सभेमध्ये मंजूर करण्यात आले. दरम्यान श्रीराम ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला यावर्षी दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल पतसंस्थेचे अभिनंदन करण्यात आले.
श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला 2021 मध्ये दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले |
चालू वर्षांमध्ये संस्थेची उलाढाल 66 कोटी रुपयांची झाली असून संस्थेकडे एक कोटी रुपये शेअर्स भांडवल व नऊ कोटी 77 लाख रुपयांची ठेवी आहेत तसेच थकबाकीचे प्रमाण 4. 87 टक्के आहे . सर्व तरतुदी नंतर नफा सोळा लक्ष रुपयाच्या आसपास आहे मात्र एनपीए साठी जास्त तरतूद करावी लागत आहे कोरोना काळामुळे सहकार खात्याने यामध्ये काही सवलती दिल्यामुळे नफ्याचे प्रमाण चांगले राखता आले.
सदर सभेसाठी गूगल ॲप वर रोहित गावडे यांनी सहकार्य केले संस्थेचे सचिव महेश जगताप यांनी विषय पत्रिका व सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली कामकाजामध्ये अनिल धुमाळ दिगंबर घाडगे, श्रीकांत चव्हाण, त्रिंबक बाराते, दादासाहेब गावडे पाटील या सभासदांनी व सोसायटीचे चेअरमन तानाजी गावडे यांनी आपले मत व्यक्त केले व काही प्रश्न विचारले संस्थेला चालू वर्षी चा महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मार्फत दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी मिळाल्यामुळे सभासदांकडून संस्थेचे संचालक व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले संस्थेकडून सध्या आरटीजीएस एनईएफटी तसेच बीबीपी एस द्वारे वीज बिल भरणा सुविधा सुरू आहेत त्याचबरोबर चालू महिन्यामध्ये यु पी आय कोड संस्थेस प्राप्त होणार असून त्यामुळे सभासदांना क्यू आर कोड देणे शक्य होणार आहे त्यामुळे गुगल फोन पे वरून संस्थेचे व्यवहार जास्त वेगाने होतील.
सभासदांना भेटवस्तू देताना श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी |
संस्थेचे चेअरमन डॉ. शिवाजी गावडे यांनी आभार व्यक्त करताना, संस्थेमध्ये आणि सर्व सहकार क्षेत्रामध्ये संचालक कर्मचारी किंबहुना सर्व सभासदांचे प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे, काही देशांमध्ये सहकारी संस्थेचे सभासद होताना त्यांना प्रशिक्षण दिले जाते, मगच त्यांना सभासद केले जाते. त्याच बरोबर देशाचे नवीन सहकार मंत्री अमित शहा व राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आपल्या विभागाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच शाखेतील सर्व कर्मचारी तालुक्यातील सहाय्यक निबंधक धायगुडे, डी डी आर , महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व त्यांचे सहकारी फेडरेशनच्या सीईओ सुरेखाताई लवांडे आणि सर्व सभासद हितचिंतक ठेवीदार यांचे आभार मानले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले त्या बद्दल आभार मानले. भविष्यामध्ये ठेवीदारांना ठेवीवर ज्यादा व्याजदराच्या अपेक्षा असते व कर्जदारांना कर्जावर कमी व्याजदर अपेक्षित असतो, या दोन्हीचा सुवर्णमध्य साधून संस्थेने व्यवस्थापकीय खर्च व इतर खर्च कपात करून ठेवीदारांचे व कर्जदारांचे समाधान करण्याचा व सुवर्णमध्य साधण्याचा मानस व्यक्त केला.
No comments