Breaking News

आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून ज्वारी पिकाचे उत्पादन वाढवा - भास्करराव कोळेकर


 Increase jawari  production by adopting modern agricultural technology - Bhaskarrao Kolekar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सासकल येथे शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिक,  फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, स्मार्ट प्रकल्प, PMFME इत्यादी योजनांची माहिती देऊन शेतकरयांनी आधुनिक तंत्रज्ञानचा अवलंब करून ज्वारी पिकाचे उत्पादन वाढवावे असे आवाहन  उपविभागीय कृषि अधिकारी फलटण भास्कराव कोळेकर यांनी केले.

    कृषि विभागा मार्फत सासकल येथे रब्बी हंगाम ज्वारी बियाणे वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी भास्कराव कोळेकर बोलत होते. मंडळ कृषि अधिकारी विडणी अमोल सपकाळ, कृषि सहाय्यक सासकल सचिन जाधव व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

     यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी फलटण भास्कराव कोळेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रबी ज्वारी पीक प्रात्यक्षिक मधील ऑनलाईन अर्ज केलेल्या, शेतकऱ्यांना ज्वारी फुले सुचित्रा या वाणाचे बियाणे तसेच जैविक बीज प्रक्रियेसाठी ऍझोटोबॅक्टर व पी एस बी वाटप करण्यात आले.

    मंडल कृषि अधिकारी विडणी अमोल सपकाळ यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ज्वारी प्रकल्प योजने बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

    यावेळी कृषि सहाय्यक सासकल सचिन जाधव यांनी ज्वारी बियाण्यास रासायनिक व जैविक जिवाणू बीजप्रक्रिया महत्त्व व फायदे  माहिती यांनी दिली. 

    कार्यक्रमात ज्वारी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच ज्वारी पिकास रासायनीक खत मात्रा याबाबत सविस्तरपणे यावेळी मार्गदर्शन केले.

No comments