Breaking News

मॉर्निंग वॉक करत असलेल्या वृद्धास आयशर टेम्पोची धडक ; वृद्ध ठार

Eicher Tempo hits an old man doing a morning walk; The old man was killed

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ ऑक्टोबर - कोळकी ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण - दहिवडी रस्त्यावर संदीपा ढाब्या जवळ एक सहा चाकी आयशर टेम्पोने,  मॉर्निंग वॉक करत असणाऱ्या वृद्धाला पाठीमागून धडक दिली. झालेल्या अपघातामध्ये वृद्ध ठार झाला आहे. तर आयशर टेम्पो चालक फरार आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 18/10/2021 रोजी सकाळी 07.00 वाजण्याच्या सुमारास कोळकी गावच्या हद्दीत संदीपा ढाब्या जवळ दहिवडी बाजुकडुन फलटण बाजुकडे आबा दशरथ खरात वय 63 वर्षे, मुळ रा. कलेढोण ता. खटाव जि. सातारा सध्या रा. नक्षत्र अपार्टमेंट, कोळकी ता. फलटण हे रस्त्याच्या पश्चिम किनारपट्टीने वॉकिंग करत होते. त्यावेळी दहिवडी वरून फलटण दिशेला येणाऱ्या लाल रंगाच्या आयशर सहाचाकी गाडी  क्र. MH.23.AU.7700 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता, हयगयीने, अविचाराने चालवुन रस्त्याच्या पश्चिम किनारपट्टी चालणाऱ्या आबा दशरथ खरात यांना  पाठीमागुन जोराची धडक दिली. झालेल्या अपघातात आबा खरात हे गंभीर जखमी झाले,  त्यांना उपचारास दवाखान्यात न नेता अथवा अपघाताची खबर पोलीस स्टेशनला न देता, आयशर टेम्पो चालक पळुन गेला.  तर आबा खरात हे लाईफ लाईन हॉस्पीटल फलटण येथे उपचार घेत असताना 07.30 वा. चे सुमारास मयत झाले असल्याची  फिर्याद सुरुज आबा खरात  यांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करित आहेत.

No comments