फलटण तालुक्यात 17 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 6
फलटण दि. 19 ऑक्टोबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 18 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 17 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 6 रुग्ण तर ग्रामीण भागात 11 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक गिरवी येथे 3 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 18 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 17 बाधित आहेत. 17 बाधित चाचण्यांमध्ये 3 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 14 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात 11 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात पिंप्रद 1, विडणी 1, निरगुडी 1, गिरवी 3, राजुरी 1, राजाळे 1, निंबळक 1, नायगाव ता. कोरेगाव 1, तोंडले ता. माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
यामध्ये काही फलटण तालुक्याबाहेरील व्यक्ती आहेत, परंतु त्यांनी कोरोना चाचणी फलटण तालुक्यात केली असल्यामुळे त्यांचा इथे उल्लेख करण्यात आला आहे.
No comments