Breaking News

पाऊस पडला येता जाता..... श्रीकांता कमलाकांता... ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांचा भोंडला

Bhondala program of the students in the Bloom English Medium School

    फलटण( गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ ऑक्टोबर - पाऊस पडला येता जाता..... श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.....  अशी विविध भोंडल्याची पारंपारिक गाणी व खेळासह गुणवरे, ता. फलटण जि. सातारा येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात नुकताच नवरात्रीनिमित्त विद्यार्थ्यांचा 'भोंडल्याचा' कार्यक्रम घेण्यात आला. 

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला भोंडल्याचे पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री ईश्वर गावडे व प्राचार्य श्री संदीप किसवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी फेर धरून भोंडल्याची गाणी गायली. डब्यातील खाऊ ओळखणे हा खेळ घेण्यात आला. त्याचप्रमाणे कोरोना परिस्थितीत आपण कोणत्या नियमांचे पालन करावे याचे विद्यार्थ्यांनी पोस्टर्स च्या साह्याने सर्वांना जनजागृतीचा संदेश दिला. याप्रसंगी कोरणा च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. अशा पारंपरिक खेळामुळे विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह द्विगुणित होऊन शाळेचा परिसर बहरला.

     इयत्ता पाचवी पासून च्या पुढील वर्गाचा हा भोंडल्याचा कार्यक्रम, नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना व सर्व पालकांना झूम ॲप वर थेट प्रक्षेपण च्या माध्यमातून दाखवण्यात आला.

     कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील श्री गिरीधर गावडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता ठोंबरे यांनी केले तर आभार रमेश सस्ते यांनी मानले.

No comments