Breaking News

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा - गुरुदत्त काळे

Take advantage of weather based fruit crop insurance scheme under Pradhan Mantri Pik Bima Yojana

    सातारा दि.12 (जिमाका):    भौगोलिक मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा पीक उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) माहितीसाठी कार्यशाळेचे आयोजन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सातारा व कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आशीर्वाद मंगल कार्यालय, वाठार स्टेशन येथे संपन्नन झाले.

    या कार्यशाळेस कृषी उपसंचालक  विजयकुमार राऊत , कोल्हापूरचे  उप-सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सुभाष घुलेसाहेब, सेंद्रीय शेती तज्ञ व प्रक्रिया उद्योग सल्लागार  विकास देशमुख, कोरेगावचे  तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके आदी उपस्थित होते.

     श्री. सुभाष घुले यांनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ कोल्हापूर, यांनी भौगोलिक मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा पीक अधिकृत वापरकर्ता उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणीचे महत्त्व सांगितले तसेच "भौगोलिक मानांकन व कृषि पणन मंडळांच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करताना" कृषी विभागाच्या विशेष प्रयत्नामुळे २०१६ मध्ये या पिकास भौगोलिक मानांकन प्राप्त झाले होते. भारतीय डाक विभागाच्या स्पेशल कव्हर मुळे त्याची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. घेवडा उत्पादक शेतकऱ्यांनी आता फक्त GI मानांकनवर न थांबता शासनाच्या विविध योजनांचे माध्यमातून घेवडा उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे  व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बंधूनी याचा लाभ घेणेबाबत आवाहनही केले.

    विजयकुमार राऊत यांनी भौगोलिक मानांकन व भारतीय डाक विभागाच्या स्पेशल कव्हर ही जिल्ह्यासाठी गौरवशाली व अभिमानास्पद बाब असून प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME)  या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी छोटे मोठे प्रक्रिया उद्योगात सहभागी होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

     बापूसाहेब शेळके यांनी कृषी  विभागाच्या प्रयत्नामुळे सन-२०१६ मध्ये भौगोलिक मानांकन प्राप्त झालेला वाघा घेवडा आज थेट पोस्टाच्या तिकिटावर विराजमान झाला असून भारतीय डाक विभागाने वाघ्या घेवड्याचे स्पेशल तिकीट कव्हर प्रसिध्द केल्याने त्याची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे.  ही बाब वाघा घेवडा उत्पादक शेतकरी बांधवांचे हिताची असून आता उत्तर कोरेगाव मधील शेतकरी बंधूनी शासनाच्या "विकेल ते पिकेल" धोरणांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीचे माध्यमातून वाघा घेवड्याचे आकर्षक पॅकिंग व उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थापनातून घेवडा उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे , असा विश्वासही कार्यशाळेप्रसंगी व्यक्त केला.

No comments