पक्षाने आदेश दिल्यास गुणवरे गटातून जिल्हा परिषद लढवणार - सौ.उमा दत्ता भोसले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - गुणवरे जिल्हा परिषद गटातून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आदेश दिल्यास, शिवसेनेतून निवडणूक लढविणार असल्याची माहिती सरडे येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता भोसले यांच्या पत्नी सौ.उमा भोसले यांनी दिली आहे.
सरडे गाव हे जिल्हा परिषद गुणवरे गटात नव्याने समाविष्ट झाले असले तरी गुणवरे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावात दत्ता भोसले यांचा मोठा मित्रपरिवार आहे. शिवाय विकासकामे खेचून आणण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरडे गावात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत.
विशेषतः गुणवरे, साठे, मठाचीवाडी, गोखळी आसू आदी मोठ्या गावात दररोजचा संपर्क असल्याने पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार असल्याचे सौ.उमा भोसले यांनी सांगितले.

No comments