बरड जिल्हा परिषद गटात गंगाराम रणदिवे यांना उमेदवारी मिळावी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी सचिन सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सातारा जिल्हाध्यक्ष रणजितभैय्या देशमुख व फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी(बेडके) यांच्या नेतृत्वाखाली गेली १९ वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करणारे मुंजवडी गावचे युवा नेतृत्व सातारा जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.गंगाराम अरुण रणदिवे हे प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जाणारा व राजकीय सामाजिक चळवळीमध्ये तसेच जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी आवाज उठवणारा कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात.
आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंजवडी, निंबळक, राजुरी, बरड, बागेवाडी, कुरवली, आंदरुड, जावली, मिरढे, वडले गावांमध्ये गंगाराम रणदिवे यांचा युवा वर्ग व नागरिकांसोबत मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा बालेकिल्ला असलेल्या बरड जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी मिळावी अशी जनतेची मागणी आहे.

No comments