फलटण येथील फॅब्रिकेशन दुकानात चोरी ; १७८२० रुपयांचा माल लंपास
फलटण दि. ४ सप्टेंबर २०२१ (गंधवार्ता वृत्तसेवा) - स्वामी विवेकानंद नगर फलटण येथील फॅब्रिकेशनच्या दुकाना बाहेर कंपाऊंडच्या आत ठेवलेले १७ हजार ८२० रुपये किंमतीचे फॅब्रिकेशनचे लोखंडी साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.
अधिक वृत्त असे, रूपाली आनंत सोनवणे यांनी स्वामी विवेकानंदनगर येथील फॅब्रिकेशन दुकानात लोखंडाच्या लग पट्ट्या (शटरच्या) ५ गोण्या सातारा येथून आणून तो माल दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री दुकानाच्या गेट च्या आत ठेवून गेटला कुलुप लावून, फॅब्रिकेशन दुकानाच्या शेजारी असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गेल्या. नंतर दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी पुण्याला गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाकरीता गेल्या होत्या. पुण्याहून परत आल्यानंतर दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता त्या फॅब्रिकेशन दुकानात गेल्या असता दुकानाच्या कंपाउंडची जाळी उचकटलेली दिसली. गेटचे कुलुप काढुन गेटच्या आत गेल्यावर लोखंडाच्या लग पट्ट्या (शटरच्या) पाच गोण्या ठेवल्या होत्या त्यापैकी तीन गोण्या गायब झाल्याच्या दिसल्या, कोणीतरी अज्ञात चोरटयांनी, ११४०० रुपये किंमतीची लोखंडी लग पट्टी एक गोनी, २७२० रुपये किंमतीची लोखंडी एम.एस.गाईड एक गोणी, ३७०० रुपये किंमतीची लोखंडी यलकान एक गोणी असा एकूण १७ हजार ८२० रुपये किंमतीचे फॅब्रिकेशन साहित्य चोरून नेल्याची फिर्याद रूपाली आनंत सोनवणे यांनी दिली आहे.

No comments