गणेश मंडळांना मंडप व अनुषंगीकबाबींच्या परवानगीसाठी ठाणे प्रभारी अधिकारी यांना अधिकार
सातारा (जिमाका): गणेशोत्सव 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत साजरा होत आहे. पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना खासगी व्यक्ती अगर संबंधित गणेश मंडळाच्या वतीने सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा प्रकारे कमानी, मंडप, विद्युत रोषणाई, कटाआऊट्स, जाहिराती इत्यादी उभारण्यासाठी परवानगी मागितल्यास पोलीस अधीक्षक अजकुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना योग्य त्या अटी व शर्तींवर संबंधितांना परवानगी देण्यास प्राधिकृत केले आहे.

No comments