डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव’ पुरस्कार जाहीर
फलटण : यंदाच्या प्रतिष्ठित ‘उषा-वैभव’ पुरस्कारासाठी डॉ. प्रसाद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. हा मानाचा पुरस्कार सोहळा येत्या ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सजाई गार्डन येथे उत्साहात पार पडणार आहे.
या सोहळ्यात ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते डॉ. जोशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे तसेच प्रख्यात पत्रकार प्रसन्न जोशी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
याच निमित्ताने अनुबंध कला मंडळाच्या वतीने ‘मॅजिकल आरडी नाईट’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, संगीतप्रेमींसाठी ही एक खास मेजवानी ठरणार आहे.
हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असून, परिसरातील नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments