आसू येथे तलवार हल्ला ; 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
फलटण दि.५ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे आसू ता. फलटण येथे हातात काठी, कुऱ्हाड, चाकू अशी हत्यारे घेऊन, जमाव जमवून सागर बलभीम पवार व कुटुंबियांना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी आसू तालुका फलटण येथील बारा जणांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 29/08/2021 राेजी रात्री 10.00 वा.चे दरम्यान मौजे आसू तालुका फलटण गावच्या हद्दीत,1) योगेश स्वामीनाथ पवार 2) आबा खरात पूर्ण नाव माहीत नाही 3) कुमार धर्मा पवार 4) अक्षय बाबुराव पवार 5) बाळू आत्माराम पवार 6)सुमित बाळासो पवार 7) वैशाली स्वामीनाथ पवार 8) सोनाली योगेश पवार 9) विद्या स्वामीनाथ पवार 10) आनंदा रामभाऊ पवार 11) अमोल धर्मा पवार 12) शांताबाई धर्मा पवार सर्व रा. आसू ता. फलटण यांनी सागर बलभीम पवार हे त्यांच्या घरासमोर असताना यातील, आरोपी 1 ते 12 यांनी हातात काठी, कुऱ्हाड, चाकू अशी हत्यारे घेऊन, सर्वांनी मिळून, जमाव जमवून, संगनमत करून, शिवीगाळ दमदाटी करून, सागर बलभीम पवार व कुटुंबियांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने हल्ला केला असल्याची फिर्याद सागर बलभीम पवार यांनी दिली आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. पी. दराडे हे करीत आहेत. याप्रकरणी 4 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
No comments