आसू येथे लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला ; 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
फलटण दि.५ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे आसू तालुका फलटण येथे चालू असलेल्या भांडणात, भांडण करू नका असे म्हटल्याच्या कारणावरून चिडून जाऊन, हातात लोखंडी रॉड, तलवार, काठी, दगड घेऊन कुमार धर्मा पवार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याप्रकरणी आसू तालुका फलटण येथील आठ जणांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 29/08/2021 राेजी रात्री 10.30 वा.चे दरम्यान मौजे आसू तालुका फलटण गावच्या हद्दीत, सागर बलभीम पवार व योगेश सोमनाथ पवार यांच्यात योगेश च्या घरासमोर असणाऱ्या रस्त्यावरून वाद सुरू होता, त्यावेळी कुमार धर्मा पवार हे सागर यास म्हणाले की, भांडण करू नका, या कारणावरून चिडून जाऊन, 1) बुद्धभूषण मनोहर पवार 2 ) सागर बलभीम पवार 3) सुहास मोहन पवार 4) सनी बलभीम पवार 5) बलभीम नामदेव पवार 6) मनोहर नामदेव पवार 7) संगीता बलभीम पवार 8) कल्पना मनोहर पवार सर्व राहणार आसू तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी बेकायदेशीर जमाव जमवून, हातात लोखंडी रॉड, तलवार, काठी, दगड घेऊन कुमार धर्मा पवार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने, हल्ला करून, कुमार धर्मा पवार यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूस व उजव्या पायाच्या नडगीवर मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद कुमार धर्मा पवार यांनी दिली आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.ए. सोनवणे करीत आहेत. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
No comments