Breaking News

आभाळ आहे पक्षांचे, नाही चायना मांजाचे - फलटण येथे चायना मांजा विरोधी रॅलीत घुमला आवाज

The sky belongs to the parties, not to China Manja - the voice echoed in the anti-China Manja rally in Phaltan

    फलटण फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ जुलै २०२५ -   नागपंचमी हा सण पर्यावरण पूरक अशा पद्धतीने सर्वत्र साजरा केला जात असतो, मात्र यावेळी अनेक ठिकाणी तरुण-तरुणी, मुले पतंग उडविण्याचा आपला पारंपारिक छंद जपत असतात मात्र अलीकडच्या काळात पतंग उडवताना वापरण्यात येणारा चायना मांजा हा मानव जातीला व पशु पक्षाला घातक असा असून, यामुळे अनेक वेळा लोकांना तसेच पक्षांना जीव गमवावे लागलेले आहे, म्हणून चायना मांजा विरोधी फलटण येथील नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर व आकांक्षा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

    प्रामुख्याने फलटण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, माजी प्राचार्य सुधीर इंगळे, आकांक्षा क्लासेसचे सर्वेसर्वा संजय जाधव, तसेच नेचर अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या शुभहस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

    रॅलीमध्ये बहुसंख्य मुले व मुली सहभागी झाल्या होत्या. यावेळी एकच घोषणा देण्यात येत होत्या की, "आभाळ आहे पक्षांचे" "नाही चायना मांजाचे", "एक पतंग आकाशात" "हजारो पक्षी धोक्यात" "बंद करा बंद करा" "चायना मांजा बंद करा" अशा आशयाच्या घोषणा देण्यात येत होत्या. मुधोजी हायस्कूल येथून सुरू झालेली हि रॅली गजानन चौक - महात्मा फुले- चौक डेक्कन चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून फिरून पुन्हा या रॅलीची सांगता मुधोजी हायस्कूल येथे करण्यात आली.

    यावेळी बोलताना प्राचार्य सुधीर इंगळे म्हणाले चायना मांजा हा पर्यावरणासाठी तसेच वन्यजीव प्राण्यासाठी घातक असून यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखील होऊ शकते. तसेच चायना मांजाचे लवकर विघटन होत नाही. त्यामुळे तो पर्यावरणासाठी देखील हानिकारक आहे. अलीकडे शासनाने देखील चायना मांजाचा वापर करण्यावर बंदी आणलेली आहे. म्हणून चायना मांजा कोणीही वापरू नका चायना मांजा वापरत असताना आढळून आल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे  दाखल होऊ शकतात आणि प्रामुख्याने चायना मांजा किती घातक आहे व त्याचे होणारे गंभीर परिणाम या सर्व बाबींची माहिती सर्वांच्या समोर जावी या हेतूने आकांक्षा क्लासेस व नेचर अँड वाइल्ड वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने या जनजागृती रॅलीचे आयोजन  करण्यात आल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.

No comments