सातारा जिल्ह्यात एमएचटी-सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा केंद्रांवर कलम 144 लागू
सातारा (जिमाका): एमएचटी-सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा -2021 जिल्ह्यातील केंद्रांवर 4 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 20 स्प्टेंबर ते दिनांक 1 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी लागू केले आहेत.
एमएचटी-सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा यशोदा टेक्निकल कॅम्पस, वाढे फाटा, सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग सदरबझार, सातारा, डॉ. दौलतरावर अहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, विद्यानगर कराड व फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण या केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्रांवर नेमलेले अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयाच्या परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी.बुथ, आयएसडी बुथ, फॅक्स केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॅझीस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप परीक्षा केंद्राच्या 100 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेहण्यास मनाई करण्यात आली आहे.

No comments