फलटण तालुक्यात 55 कोरोना बाधित ; शहरात 9
फलटण दि. 18 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 55 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 9 रुग्ण तर ग्रामीण भागात 46 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक तरडगाव व पिंपरद येथे प्रत्येकी 4 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 55 बाधित आहेत. 55 बाधित चाचण्यांमध्ये 24 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 31 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 9 तर ग्रामीण भागात 46 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात बरड 2, कापशी 1, कोरेगाव 1, मिरगाव 1, हिंगणगाव 3, भिलकटी 1, पिंपरद 4, जिंती 2, निंबळक 1, पाडेगाव 1, रावडी बुद्रुक 1, सोमंथळी 3, सोनवडी 1, तरडफ 1, तरडगाव 4, टाकळवाडा 1, खुंटे 1, ढवळ 1, कोळकी 2, मिरेवाडी 1, विठ्ठलवाडी 1, विडणी 2, गिरवी 3, फरांदवाडी 1, साठे 1, दुधेबावी 1, चौधरवाडी 1, जाधववाडी 1, आसू 1, अहमदपूर तालुका लातूर 1रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments