Breaking News

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : फलटण शहरातून न्यायाधीश, वकील यांची बाईक रॅली

बाईक रॅली मध्ये वकिलांसह न्यायाधीश यांनीही सहभाग घेतला होता 

Bike rally of judges and lawyers from Phaltan city

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ सप्टेंबर - फलटण न्यायालय येथे दिनांक २ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालवधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून त्या अनुशंगाने   शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१  रोजी  कार्यक्रमाची रंगित तालिम व सर्वांना या महोत्सवाची माहीती देण्यासाठी फलटण शहरामधुन न्यायाधीश, फलटण वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी यांनी बाईक रॅली काढली होती.

    सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांचे अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व मा. जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, सातारा यांचे आदेशानुसार व फलटण तालूका विधी सेवा समिती यांच्या वतीने फलटण न्यायालय येथे दिनांक २ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालवधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे.

    त्या अनुशंगाने शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाची रंगित तालिम व सर्वांना या महोत्सवाची माहीती देण्यासाठी फलटण शहरामधुन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीस फलटण न्यायालयातील न्यायाधीश सौ. अर्चना.एच. ठाकूर, सौ. उज्वला एम. वैद्य, सौ. शुभांगी बी. ढवळे, सौ. शितल डी. साबळे, श्री. केदार. ए. पोवार, श्री. युवराज एम. पाटील तसेच फलटण बार असोशिएनचे अध्यक्ष श्री. एम. के. शेडगे व वकील बार असोशिएशन कमिटी सदस्य, विधीज्ञ, फलटण पो.स्टे. चे स.पो.नि. व कर्मचारी व फलटण न्यायालयातील दोन्ही सहा अधिक्षक, सर्व कर्मचारी वृंद यांचा सहभाग होता.

    सदर रॅलीमध्ये विधीज्ञांतर्फे श्री. एन. एस. भोसले यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात होणा-या कार्यक्रमांची माहीती दिली आणि जनतेस जास्तीत जास्त सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्यानंतर सदरहू रॅलीची सांगता करण्यात आली.

No comments