रस्ते, परिवहन व महामार्ग केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा सातारा जिल्हा दौरा
सातारा, दि. 23 (जिमाका): भारत सरकारचे रस्ते, परिवहन व महामार्ग केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. पुणे येथून हेलिकॉप्टरने विमानाने कराड, जि. सातारा विमानतळावर आगमन व कृष्णा हॉस्पीटल मलकापूर मोटारीने कराडकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. कृष्णा हॉस्पीटलला भेट. सकाळी 10.45 वा. कराड-ढेबेवाडीरोड विंग कडे प्रयाण सकाळी 11 वा. श्री. कृष्णा व्हॅली बहुउद्देशीय प्रकल्पाला भेट. सकाळी 11.30 वा. हॉटेल पंकज कराड कडे प्रयाण. दुपारी 12 वा. हॉटेल पंकज कराड येथे जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कराड येथील कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.15 वा. द फर्न रेसिडन्सी कराड कडे मोटारीने प्रयाण. दुपारी 1.30 ते 3 वा. द फर्न रेसिडन्सी येथे राखीव. दुपारी 3 वा. द फर्न रेसिडन्सी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभरणी समारंभास उपस्थिती. दुपारी 4 वा. कराड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.15 वा कराड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे प्रयाण.
No comments