गाडीची काच फोडून १ लाख ९७ हजार रुपयांची चोरी; चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद
फलटण दि.२३ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहरातील अशोका हॉटेल शेजारी उपळेकर मंदीराच्या पाठीमागे लावलेल्या चारचाकी गाडीची काच फोडुन, गाडीत ठेवलेली बॅग व त्यातील रोख रक्कम १ लाख ९७ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे चोरी करताना कैद झाले असून, त्या दिशेने पोलिसांचा तपास चालू आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास,फलटण शहरातील अशोका हॉटेल शेजारी, उपळेकर मंदीराच्या पाठीमागे लावलेल्या गाड़ी नंबर एम एच ११ सी डब्ल्यू ८१४८ या गाडीची पाठीमागील काच फोडुन, गाडीत ठेवलेली बॅग व त्यातील रोख रक्कम रक्कम १ लाख ९७ हजार रुपये तसेच स्टेट बँकेचे पासबुक, चेकबुक, पी.पी.ओ. व इतर कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची फिर्याद चंद्रकांत रंगराव माने रा. वेळोशी ता. फलटण यांनी दिली आहे.
दरम्यान चोरटे गाडीची काच फोडताना व गाडीतून बॅग उचलून पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले असून त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार येळे हे करीत आहेत.
No comments