Breaking News

सातारा जिल्ह्यात 433 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 3 बाधिताचा मृत्यू

Corona virus Satara District updates :  3 died and 433 corona positive

102 जणांना दिला आज डिस्चार्ज

    सातारा दि.10 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  433 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

    तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

    जावली 9 (9891), कराड 35 (38375), खंडाळा 12 (13960), खटाव 60 (24824), कोरेगांव 48 (21409), माण 29 (17259), महाबळेश्वर 8 (4621), पाटण 6 (10104), फलटण 96 (35794), सातारा 103 (50145), वाई 18 (15547) व इतर 9  (1972) असे  आज अखेर एकूण 243901 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या कराड 1, माण 1 व फलटण 1 असे एकूण 3 असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6014 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

    जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  102  जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 *एकूण नमूने – 1904227
*एकूण बाधित –243901
*घरी सोडण्यात आलेले 231728
*मृत्यू -6014
*उपचारार्थ रुग्ण- 9098

No comments