फलटण तालुक्यात 70 कोरोना बाधित ; शहर 12, हिंगणगाव 6
फलटण दि. 25 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 12 रुग्ण तर ग्रामीण भागात 58 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक हिंगणगाव येथे 6 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 70 बाधित आहेत. 70 बाधित चाचण्यांमध्ये 50 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 20 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 12 तर ग्रामीण भागात 58 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात हिंगणगाव 6, गिरवी 5, खराडेवाडी 1, खुंटे 1, ठाकूरकी 2, बरड 2, कोळकी 4, बिबी 1, मिरगाव 4, पिंपरद 3, विडणी 4, पवारवाडी 1, फरांदवाडी 2, राजाळे 2, राजुरी 1, शेरेचीवाडी 1, साखरवाडी 1, साठे 1, सोमंथळी 1, चौधरवाडी 1, तरडगाव 1, निरावागज तालुका बारामती 1, ढवळेवाडी 1, बोडकेवाडी 1, मानेवाडी 2, झिरपवाडी 1, होळ 1, आंदरुड 2, आळजापुर 1, गोखळी 1, पुणे 2 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments