लहान भावाने केले मोठ्या भावावर कुऱ्हाडीने वार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ ऑगस्ट - शेतातील सामाईक विहिरीचे पाळीवरुन पुर्वी झालेले भांडणाचा राग मनात धरुन, लहान भावाने, मोठ्या भावास कुऱ्हाडीने डोक्यात व हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बागाववस्ती मलवडी ता. फलटण येथील लहान भाऊ किसन साहेबराव बागाव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी रात्रौ ०१.०० वा. चे. सुमारास मौजे मलवडी बागाववस्ती ता.फलटण येथे, किसन साहेबराव बागाव वय ७२ वर्षे रा. मलवडी बागाववस्ती ता. फलटण यांनी बागाववस्तीवरील बाळु साहेबराव बागाव यांच्या राहत्या घरातील स्वयंपाकाच्या शेजारील खोलीत मोठा भाऊ बाळु साहेबराव बागाव व त्यांची पत्नी अनुसया बाळु बागाव हे झोपलेले असताना, लहान भाऊ किसन साहेबराव बागाव वय ७२ वर्षे रा.बागाववस्ती मलवडी ता.फलटण जि. सातारा याने शेतातील सामाईक विहिरीचे पाळीवरुन पुर्वी झाले भांडणाचा राग मनात धरुन घराचे दार धक्का देवुन उघडुन, घरात प्रवेश करून, बेडवर झोपलेले बाळु साहेबराव बागाव वय ७४ वर्षे रा. बागाववस्ती मलवडी ता.फलटण जि. सातारा यांचे नरडे धरुन, हातातील कुऱ्हाडीने डोक्यात व उजवे हातावर वार करुन गंभीर जखमी करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद मोठ्या भावाची पत्नी अनुसया बाळू बागाव यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एन. जाधव हे करीत आहेत.
No comments