13 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन
सातारा - शहरी भागातील लोकांमध्ये नैसर्गिकरित्या उगवलेल्या रानभाज्यांचे तसेच रानफळांचे महत्व व आरोग्य विषयक माहिती होण्यासाठी कृ्षी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) सातारा अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये शुक्रवार दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल लेक व्हिव, सातारा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे. यावेळी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रानभाजी विक्री महोत्सवामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कषि अधिकारी सातारा यांनी केले आहेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्र. 02162-226822 असा आहे. सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
No comments