केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा फलटण शहर व तालुका भाजपा कडून निषेध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ ऑगस्ट - कायद्याचा दुरुपयोग करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेल्या अटकेचा निषेध फलटण शहर व तालुका भारतीय जनता पार्टीचे वतीने करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री मा.ना. नारायण राणेसाहेब यांना राज्य सरकारने केलेली अटक ही राजकीय सुडबुध्दीने करण्यात आली आहे. भाजपाच्या जनादेश यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे, महाविकास आघाडी सरकार भाजपशी सुडबुद्धीने वागत आहे. कायद्याला धाब्यावर बसवून आणि पोलीस यंत्रणेला हाताशी धरून बेकायदेशीरपणे केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करणारे निवेदन फलटण तालुका व शहर, भाजपा च्या वतीने फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप व तहसीलदार श्री समीर यादव साहेब यांना दिले.
याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा मोर्चाचे राज्य संघटक सुशांत निंबाळकर, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष नितिन वाघ , निलेश चिचकर, युवा मोर्चाचे विशाल नलवडे, सुरज तांदळे, ओबीसी सेलचे माऊली नाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
No comments