फलटण मध्ये नारायण राणे यांच्या पोस्टर वर काळी शाई फासून शिवसेनेकडून निषेध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ ऑगस्ट - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यां विषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून नारायण राणे यांच्या पोस्टरवर काळी शाई फासून फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
काल फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. तर आज दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक फलटण येथे शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पोस्टरवर काळी शाई फासून संताप व्यक्त करत निषेधाच्या घोषणा दिल्या.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तमाम शिवसैनिकांचे श्रध्दारस्थान आदरणीय श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा फलटण तालुक्यातील शिवसैनिंकाकडुन निषेध व्यक्त करण्यात आला. नारायण राणे हे सातत्याने शिवसेना पक्ष व पक्षप्रमुख यांच्यावरती बेताल वक्तत्व करीत असतात. त्यामुळे समाजामध्ये द्वेषाची आहे. या गोष्टीची शासनाने गंभीर दाखल घेवून नारायण राणे यांच्या वरती गुन्हा दाखल व्हावा ही तमाम महाराष्ट्रातील तसेच फलटण तालुक्यातील शिवसैनिकांची मागणी असल्याचे निवेदन फलटण तालुका शिवसेनेकडून काल देण्यात आले होते.
No comments