Breaking News

शेतातील बाभळी काढत असताना ट्रॅक्टर पलटी ; एक ठार

Tractor overturns while removing acacia from the field; One killed

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ ऑगस्ट - शेतातील येडपाटाच्या बाभळी काढत असताना ट्रॅक्टर हयगयीने चालवुन ट्रॅक्टर पलटी होवुन झालेल्या अपघातामध्ये पाठीमागे लाकडे गोळा करणारे कोळकी ता. फलटण येथील आनंदराव आण्णा शिंदे यांचा मृत्यू झाला.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या दरम्यान, मौजे निरगुडी ता.फलटण गावचे हद्दीत महादेव मंदिराजवळ, देवराज किसन तांबे यांचे शेतातील येडपाटाच्या बाभळी काढत असताना ट्रॅक्टर ड्रायव्हर बापुराव मदनराव निंबाळकर रा. विंचुर्णी ता.फलटण याने त्यांच्या ताब्यातील एम. एच. १२ जी ८८४१ महिंद्रा ५७५ कंपनीचा ट्रॅक्टर हयगयीने, अविचाराने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, चालवुन, ट्रॅक्टर पलटी होवुन झालल्या अपघातामध्ये पाठीमागे लाकडे गोळा करत असणाऱ्या आनंदराव आण्णा शिंदे यांच्या अंगावर पडुन त्यांना गंभीर दुखापत होवुन, त्यांचे मृत्युस कारणीभुत झाला असल्याची फिर्याद मुलगा प्रशांत आनंदराव शिंदे  रा. जानाईनगर कोळकी ता.फलटण यांनी दिली आहे.

अधिक तपास पोलिस हवालदार डी.डी. कदम हे करीत आहेत.

No comments