Breaking News

तिरकवाडी येथे उद्यानकन्येकडून शेतकरी वर्ग , युवक प्रशिक्षण व वृक्षारोपण

Plantation by Uddyankanya at Tirakwadi

    फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) -  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यक्रमाअंतर्ग फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथे उद्यानकन्या समृद्धी सूत्रधार अहिवळे हिने वेगवेगळ्या विषयांवर शेतकरी वर्ग भरवले तसेच गावातील युवकांना विविध विषयांवर प्रशिक्षण दिले. कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सातव्या सत्रात तिने गावामधील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीरे आयोजित करून, एकात्मिक कीड नियंत्रण, एकात्मिक रोग नियंत्रण, मृदा परीक्षण इ. विषयावर शेतकरी वर्ग या माध्यमातून मार्गदर्शन केले.

    या दरम्यान जिल्हा परिषद शाळा तिरकवाडी येथे वृक्षारोपणाचा ही कार्यक्रम  घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक गजानन शिंदे सर व सुजाता भोईटे मॅडम यांच्या उपस्थिती मध्ये वृक्षारोपण झाले. यासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर सर, प्रा. जयेश लेंभे सर तसेच इतरही प्रध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments