Breaking News

निरगुडी येथील शेतकऱ्यांना उद्यानकन्येने दिली वृक्षारोपणाची माहिती

The gardener gave information about tree planting to the farmers of Nirgudi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - निरगुडी तालुका फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथील प्रतीक्षा सागर अहिवळे या उद्यान कन्येने पुढाकार घेईल वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण करून ग्रामस्थांना पर्यावरण तसेच वृक्षारोपण याबाबत माहिती दिली.

    यावेळी निरगुडी ग्रामपंचायत सरपंच श्री राजेंद्र मधुकर सस्ते,ग्राम विकास अधिकारी श्री एन एस कदम, ग्रामसदस्या कोमल सचिन सस्ते आणि ग्रामपंचायत सदस्य सत्यजीत दशरथ सस्ते व शाहूराज काशिनाथ सस्ते, ग्रामपंचायत कर्मचारी तुकाराम बबन आवटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

    श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. लेंभे सर व कार्यक्रमाचे समन्वय प्रा. अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या प्रतिक्षा अहिवळे हिने पर्यावरणाचे महत्त्व नमूद करत, झाडे नष्ट झाल्याने, होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती उपस्थितांना दिली. त्याच बरोबर प्रत्येकाने  झाडे लावून झाडांची निगा राखणे गरजेचे असल्याचे सांगितले.

No comments